बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

मुंबई | तुम्ही जर बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. तुम्हाला जर हे नियम माहित नसतील तर कदाचित बँकिंग कामात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

बँक ऑफ बडोदा चेक क्लिअरन्स संबंधित (Positive Pay Confirmation) नियम 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहे. बँकेच्या नवीन नियमानुसार 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल.

जर कन्फर्मेशन नसेल तर चेक परत देखील केला जाऊ शकतो. हा नियम 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकवर लागू होईल.

तुम्ही CTS क्लिअरिंगसाठी पॉझिटिव्ह पे सुविधेचा लाभ घ्या. चेकमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून बँकेने हा नियम केला आहे. बँकेने विविध माध्यमांद्वारे तपशीलांची पुन्हा पडता

1 जानेवारी 2022 पासून आरबीआयने ही नवीन सिस्टम लागू केली आहे. याअंतर्गत चेक पेमेंटच्या (Cheque Payment) माध्यमातून रक्कम पाठवताना काही माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करावी लागते.

बहुतेक बँकांनी ही पद्धती अनिवार्य केली आहे. हे खातेधारकावर असेल की त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. बँक चेकबाबत फसवणूक टाळण्यासाठी ही सुविधा लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, बँक ऑफ बडोदाने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनसाठी 8422009988 या व्हर्च्युअल मोबाइल नंबरची सुविधा दिली आहे. CPPS लिहिल्यानंतर खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेकची तारीख, चेक खाते, व्यवहार कोड, प्राप्तकर्त्याचे नाव 8422009988 या क्रमांकावर पाठवून पुष्टीकरण केलं जाऊ शकतं.

महत्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं 

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय 

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 5 बड्या नेत्यांचा भाजपत प्रवेश