मुंबई | शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता तुकडा शेती विकता येणार आहे.
राज्य सरकारकडून (State Government) तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे.
जिराईत जमीन ही 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. या निर्णयावर नागरिकांनी हरकती व सूचना पाठवाव्यात, असं आवाहन महसूल विभागाने केलंय.
तुकडेबंदी कायदा म्हणजे काय?
किफायतशीरपणे शेती करण्यास अडचण येईल असे जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत हा तुकडेबंदी संबंधीच्या तरतुदीचा उद्देश आहे. यासाठी राज्यातील निरनिराळ्या स्थानिक क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेली आहेत. अशा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा एखादया जमिनीचे क्षेत्र कमी असेल त्यास तुकडा असं समजण्यात येतं.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. पण महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू केल्याने क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”
Presidential Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन
“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”
“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा