मुंबई | घराची खरेदी करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेडी रेकनर (Ready Reckoner)अर्थात जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य कमी करण्याची तरतूद मुद्रांक कायद्यात 2018 मध्ये करण्यात आली आहे. यंदा पुण्यात रेडी रेकनरच्या दरात सरसकट वाढ न होता. काही भागातील दर हे कमी केले जाणार आहेत.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात.
मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध संघटनांकडून रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी होत होती.
मागील दोन ते तीन वर्षांत ज्या भागांत घर, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्या गोष्टींची तपासणी करून जिथे वाढ झालेली नाही, अशा भागांतील दर कमी करण्याचे प्रस्तावित केलंय.
ज्या भागात मोठी वाढ होत आहे, अशाच भागात काही प्रमाणात दरवाढ प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्याचं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शासनाने रेडी रेकनरमध्ये दर कमी करण्याची तरतूद करून सकारात्मक पाऊल उचलले. मात्र, करोना काळात या तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यंदा मात्र रेडी रेकनरचे दर अचूक करण्यावर नोंदणी व मुद्रांक विभागाने भर दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली, पाहा व्हिडीओ
“25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या ठाकरे कुटुंबाला जेल झालीच पाहिजे”
‘महिला पुरुषांसोबत पार्कमध्ये दिसल्यास…’; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान
झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य; रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपणार?
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम