SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून पैसे काढण्यासाठी आता…

मुंबई | SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाला आहे. एटीएम व्यवहार ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI कडून त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. आता नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत नाहीत.

ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून पैसे काढता येतात.

SBI ग्राहकांना त्यांच्या ATM मधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या OTP सह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी आहे.

बॅंकेनं हा नियम सुरक्षित व्यवहार व्हावा यासाठी लागू केला आहे. बॅंकेच्या या निर्णयानं ग्राहकांना बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना सोबत मोबाईल पण ठेवावा लागणार आहे.

दरम्यान, सध्या एटीएममधून पैसे काढताना अनेक गैरव्यवहार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी बॅंकेनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अशा प्रकारचा निर्णय इतर बॅंकादेखील घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

तरुणांनो तयारीला लागा, पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली”