मुंबई | राज्यातील शाळांना (Maharashtra School) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शिक्षणविभागाने हा निर्णय घेतला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी शाळा सुरू करण्यात येणार आहे.
जर सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस असेल त्या दिवसापासून शाळा सुरू करण्यात येणार आहे.
उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्यावेळेस देता येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार
“…म्हणून ईडीने धाड टाकली”, सतीश उकेंच्या अटकेनंतर नाना पटोलेंचे गंभीर आरोप
IPL 2022: ना मुंबई ना दिल्ली, मॅथ्यू हेडन म्हणतो ‘हा’ संघ यंदा IPL जिंकेल
IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ
Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…