लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे प्रशासनानं घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | कोरोना आटोक्यात येत असतानाच पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत.

कोरोनाच्या आलेल्या दोन्ही लाटेत कोरोनानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे सगळीकडे मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

लसीकरणामुळे नागरिकांना अनेक गोष्टींमध्ये सवलती मिळत आहे. अनेक ठिकाणी अडचणीही येत आहेत. यातच आता लसीकरण केलेल्यांसाठी रेल्वे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे लस घेतलेल्यांसाठी चांगली बातमी आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी लवकरच ‘मोबाइल तिकीट अ‍ॅप’ सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना याविषयी चर्चा केली.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला मोबाइल तिकीट अ‍ॅप जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ‘मोबाइल तिकीट अ‍ॅप’ सुविधेमध्ये आता लोकलनं प्रवास करणं अधिक सोईस्कर झालं आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट व पास उपलब्ध केल्यास तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रवास सुखकर होणार.

दरम्यान, या लोकलसेवेमुळे खूप मोठा दिलासा प्रवाशांना मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं सध्या ज्या लोकल धावत आहेत त्याही कमीच पडत आहेत.

कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि सुविधेंचा विचार करता कोरोना लसीकरण करणं, दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  चिंताजनक! राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

  ‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत

आता इंस्टाग्राम खर्चिक होणार; मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता

ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार