महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

पुणे | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. कोरोना काळात अनेक गोष्टी ठप्प पडल्या होत्या. नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत झालं होतं.

आता पुन्हा हळूहळू सगळं पूर्वपदावर येत आहे. लोकल ट्रेन ही कोरोनाकाळात सर्वसामान्यांसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली होती. ती ही आता पूर्वपदावर येत असलेली दिसत आहे

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या तब्बल 22 महिन्यानंतर पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने बंद केलेल्या या गाड्या पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस, सह पुणे-भुसावळ एक्स्प्रेस पुन्हा सुरु होणार आहे.

19 जानेवारीपासून ह्या गाड्या धावण्याची शक्यता आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रगती एक्सप्रेस चालू करावी, अशी मागणी प्रवासी करत होते. अखेर रेल्वे प्रशासनानं या गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटकाळात मर्यादीत प्रवासी असल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादीत स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या.

पण आता रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा आणि प्रवाशांना दिलासा देण्याची निर्णय घेतला आहे.

आता हळूहळू लोकलमधील गर्दी वाढताना पाहायला मिळत असताना रेल्वे प्रशासनाने पुर्वीसारख्या संपुर्ण फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल

  “कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार” 

  राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल

  Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  ‘या’ देशात मास्क आणि लसीपासून सूटका, सरकारचा मोठा निर्णय