सुशांतच्या फार्महाऊसवर सापडल्या महत्त्वाच्या नोट्स; वाचा यात नेमकं काय लिहिलंय!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून याप्रकरणी रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या फार्म हाऊसवर  सुशांतच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलघडा करणाऱ्या गोष्टी सीबीआयच्या हाती लागल्या आहेत. अशातच आता सुशांतच्या फार्म हाऊसवर सुशांतनं लिहिलेल्या नोट्सचा बंडल सीबीआयच्या हाती लागला आहे.

या नोट्समध्ये सुशांतनं त्याच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतनं 2018मध्ये केदारनाथ मुव्ही साईन केली होती. सुशांतच्या फार्म हाउसवर मिळालेल्या या नोट्समधील एका नोटवर सुशांतनं या मुव्हीच्या तयारीविषयी महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत.

एका नोटवर सुशांतनं सकाळी अडीच वाजता उठायचं आहे. यानंतर सुपरमैन चहा घ्यायचा आहे. चहा घेतल्यानंतर अंघोळ करायची आहे, अशा गोष्टी लिहिल्या आहेत. सुशांतनं लिहिलेल्या या गोष्टी सुशांतच्या जिवनाबद्दल खूप काही सांगून जातात. सुशांत त्याच्या करिअर बद्दल खूप जास्त गंभीर होता यासाठी तो प्रत्येक गोष्ट नियोजन करून करत होता, हे येथे प्रामुख्यानं लक्षात येतं.

सुशांतनं दुसऱ्या एका नोटमध्ये धुम्रपान न करण्याविषयी लिहिलं आहे. ‘नो स्मोकिंग’ असं सुशांतनं एका नोटवर लिहीलं आहे. तसेच सुशांतनं पुढे केदारनाथ मुव्हीची स्क्रिप्ट वाचायची आहे, असंही लिहिलं आहे. सुशांतची ही नोट सीबीआय तपासात खूप महत्वाची ठरणार आहे. कारण या नोटवरून सुशांत केदारनाथ मुव्हीपर्यंत धूम्रपानाच्या जास्त आहारी गेला नव्हता तसेच तो आपल्या करिअरबद्दल खूप जास्त गंभीर होता हे लक्षात येत आहे.

पुढच्या एका नोटमध्ये सुशांतनं आपल्या परिवारातील काही लोकांचा उल्लेख केला आहे. या गोष्टी सुशांत आपल्या परिवारावर किती प्रेम करत होता हे स्पष्ट करतात. बहिण प्रियंका आणि दाजी महेश यांच्याबरोबर टूरला जायचं आहे, असं सुशांतनं या नोटवर लिहीलं आहे.

तसेच सुशांतनं त्याच नोटवर कीर्ती सेनॉन बरोबर वेळ घालवायचा आहे, असंही लिहिलं आहे. कीर्ती सेनॉन सुशांतच्या एका मुव्हीमध्ये त्याची को अॅक्टर होती. कोणत्याही मुव्हीच्या यशासाठी त्या मुव्हीच्या दोन मुख्य कलाकारांमध्ये चांगले संबंध तयार होणं गरजेचं असतं. त्यामुळं सुशांतनं नोटमध्ये कीर्ती सेनॉनचा केलेला उल्लेख सुशांतची करिअरबद्दलची गांभीर्यता दर्शवतो.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाचं अमिष दाखवून शारीरिक अ.त्याचार केल्याचा आ.रोप; ‘या’ भाजप नेत्यावर गु.न्हा दाखल

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो

रुग्णवाहिका चालकानं दिशाच्या मृ.तदेहाबाबत दिली धक्कादायक माहिती म्हणाला…

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; सलमान खान, करण जोहरसह 8 बड्या सेलिब्रेटींना…

मृ.त्यूआधी दिशानं 100 नंबरवर फोन केला होता का?; पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा