Top news देश

कोणता मास्क अधिक सुरक्षित? तो कसा लावावा???; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची सूचना

corona e1640365249557
Photo Credit-pixabay

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता मास्कसंदर्भात नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांनी मास्क सर्वात महत्वाचं असल्याचं म्हटलंय.

प्रामुख्यानं N95 मास्क (N95 Mask) वापरण्याची शिफारस केली जाते. N95 सोबतच बाजारामध्ये KN95 मास्कदेखील विकले जात आहेत. या दोन्ही मास्कमध्ये फरक आहे. तो जाणून घेणं गरजेचं आहे.

N95 मास्कला अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थकडून (NIOSH) मान्यता मिळाली आहे. KN95 मास्कला एनआयओएसएचची मान्यता मिळालेली नाही.

चीनसारख्या इतर अनेक देशांतल्या संस्थांनी KN95 मास्कला मान्यता दिली आहे. असं सांगितलं जात आहे, की अमेरिकेत मास्कला मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे

कम्फर्टचा (Comfort) विचार केल्यास, KN95 मास्क कॅरी करण्यास जास्त कम्फर्टेबल असल्याचं मत अनेक नागरिकांनी नोंदवलं आहे. KN95 च्या तुलनेत N95 मास्क जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवणं कठीण आहे.

KN95 आणि N95 या दोन्ही मास्कची गुणवत्ता जवळपास सारखीच आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठला मास्क वापरायचा हे ठरवू शकता.

डबल मास्कमुळे आपलं तोंड पूर्णपणे कव्हर होतं. त्यामुळे कोरोनापासून सरंक्षण होण्यास अधिक मदत होते. तसेच तुम्ही फक्त कापडी मास्क वापरत असाल तर तुम्ही कोरोनापासून 51.4 टक्के सुरक्षित आहात. पण एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क म्हणजेच तुम्ही डबल मास्क वापरलात तर यामुळे तुम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे

दरम्यान, तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा अन्य कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी काम करत असाल तर डबल मास्कचा वापर करा. मात्र तुम्ही एन-95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला डबल मास्क वापरण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार