“मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ‘या’ शहरात लतादीदींचं भव्य स्मारक उभारू”

कोल्हापूर | गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधनानं देशाच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. देशाच्या सांस्कृतिक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याचं काम लतादीदींनी केलं आहे.

लतादीदींच्या जाण्यानं भारतानं आपलं अनमोल रत्न गमावलं आहे. लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण शासकिय इतमामात मुंबईच्या शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. पूर्ण देश यावेळी भावनिक झाला होता.

लतादीदींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाची चर्चा देशभर रंगली आहे. साध्या शहरापासून राजधानी मुंबईपर्यंत त्यांचं स्मारक उभारण्यावरून विविध वक्तव्य समोर येत आहेत. परिणामी आता स्मारकाचा विषय चर्चेत आहे.

लतादीदींचं स्मारक मुंबईच्या शिवाजी पार्कवर उभारण्याबाबत अनेक मतमतांतरे निर्माण होत आहेत. भाजप आमदार राम कदम यांच्या शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याच्या वक्तव्यावरून जोरदार वाद रंगला आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आता लतादीदींच्या स्मारकाबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील यांनी स्मारक उभारण्याबाबत वक्तव्य केल्यानं ते सध्या चर्चेत आहेत.

लतादीदी या भारतासह संपूर्ण जगासाठी प्रिय होत्याच, पण कोल्हापूरशी त्यांचे विशेष नाते होते. दीदींनी आपल्या कारकिर्दीची सुरवात कोल्हापुरातूनच केली. जगभर ज्या भारतरत्नाची ख्याती होती त्यांनी आपले काम कोल्हापुरात सुरू केले याचा माझ्यासह सर्व कोल्हापूरकरांना अत्यंत अभिमान आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे प्रतिक असणारा जयप्रभा स्टुडिओ सुद्धा कोल्हापुरातच आहे. त्यामुळे लतादीदींचे यथोचित स्मारक हे कोल्हापूरात जयप्रभा स्टुडिओत व्हावं, असं समस्त कोल्हापूरकरांना वाटतं. मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास सर्वजण मिळून लवकरच हे स्मारक साकार करू, असं पाटील म्हणाले आहेत.

सतेज पाटील यांनी स्मारकाबद्दल भूमिका जाहीर केल्यानंतर आता मंगेशकर कुटुंब काय निर्णय घेतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. लता दीदींचं एक भव्य स्मारक तयार व्हावं ही समस्त देशवासीयांची ईच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “नाना तुम्हाला एवढंही सांगतोय, अंगावर आला तर शिंगावर घेऊ”

“हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान, पंतप्रधान मोदींनी तात्काळ माफी मागावी अन्यथा…”

 “…म्हणून ह्रदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरून काढण्यात आलं”; पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

 “महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही”

“मोदींनी पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केलाय”