मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशावेळी लाॅकडाऊनबाबत राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात जानेवारीच्या सुरूवातीपासून रूग्णसंख्येत झपाट्यानं झाली. त्यानंतर सरकारनं अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्याची घोषणा केली होती.
राज्यात सध्या नाईट कर्फ्यू आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यात दर दिवसाला 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण सापडत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.
राज्यात सध्या कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या कोरोना रूग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत.
राज्यात सध्या कोरोना वाढू नये म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं निर्बंध लावले आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत.
राज्यामध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानूसार आम्ही कार्य करत आहोत. त्यांच्या सुचनांचं पालन केलं जात आहे.
राज्यात जर रूग्णसंख्या वाढत राहीली आणि ऑक्सिजनची कमी पडायला लागली तर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेवू शकतात, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या आजारी असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं बैठकीला उपस्थित राहत आहेत. परिणामी काही काळजी करण्याचं कारण नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार
‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल
“कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”
राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल