पुणे | राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात राज्यपाल विरूद्ध सरकार यांच्यातील संघर्ष सध्या जोरात आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारची कोंडी केली आहे.
आत्ताच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांनी सरकारची अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कोंडी केली होती. परिणामी महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर टीका केली होती.
राज्यपाल या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून राजकारण करण्यात येत आहे. भाजपची बाजू घेण्याचा प्रयत्न राज्यपाल करत आहेत, अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दैनंदिनपणे सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. आताही कोश्यारी यांनी चिंचवड येथील एक कार्यक्रमात गांधीजींच्या सत्याग्रहाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
देशसेवेसाठी चाफेकर बंधूनी संघर्ष केला आहे. हत्यार उचलली, बंदुका हातामध्ये घेतल्या आणि इंग्रजांच्या राजवटीला हादरा देण्याचं काम चाफेकर बंधुंनी केलं होतं, असं कोश्यारी म्हणाले आहेत.
चाफेकर बंधुंनी कलेक्टर रॅंडची हत्या केली त्यांच्यावर गोळ्या घातल्या. अशा क्रांतीकारकांमुळंच देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. चिंचवडमधील व्यख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी कोश्यारी बोलत होते.
1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात चापेकर, सावरकर, फडके, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी ठिणगी पेटवली होती. या ठिणगीची आग होईल म्हणून गांधीजींच्या सत्याग्रहापुर्वी इंग्रजांनी देश सोडला, असा दावा कोश्यारी यांनी केला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर यावेळी प्रकाश टाकला आहे. परिणामी सध्या कोश्यारी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या कार्यशैलीमुळं राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात नवी ओळख निर्माण केली आहे. राज्य आणि केंद्राच्या संघर्षाचं प्रतीक सध्या कोश्यारी बनले आहेत हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”
दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध
एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार