लखनऊ | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच देशात राजकीय वातावरण देखील तापायला सुरूवात झाली आहे. देशात सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे. अशात सर्व पक्षाचे नेते विविध दावे करत आहेत.
देशाच्या केंद्रीय सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, असं राजकीय जाणकार सांगतात. परिणामी उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील तब्बल 403 विधानसभा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. परिणामी सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपला आपली सत्ता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
आतापर्यंत उत्तर प्रदेशात सलग दोनवेळा एकाच पक्षाची सत्ता कधीच आली नाही. परिणामी योगी आदित्यनाथ यांच्यावर भाजपनं सर्व जबाबदारी सोपवली आहे.
काॅंग्रेसला उत्तर प्रदेशात गत काही निवडणुकांमध्ये फारसा जणाधार नसला तरी काही महिन्यांपासून काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सातत्यानं भाजपला उत्तर प्रदेशात घेरत आहेत.
प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काॅंग्रेस या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. परिणामी त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रियंका गांंधींचं मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य सध्या गाजत आहे.
उत्तर प्रदेशात काॅंग्रेस सध्या माझ्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहे. माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा चेहरा दिसत आहे का?, असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे.
सध्या काॅंग्रेसचे उत्तर प्रदेशात केवळ सात आमदार आहेत. अशात काॅंग्रेसला सत्ता मिळवण्यासाठी तब्बल 200 आमदारांचा टप्पा पार करावा लागणार आहे. परिणामी उत्तर प्रदेश निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला मोठे धक्के मिळाले आहेत. अशात सत्ता राखण्याच मोठं आव्हान देखील भाजपसमोर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती
“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”
“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”
नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा
शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”