चंदीगड | देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परिणामी विविध पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. अशात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
देशाच्या राजकारणात सध्या भाजप आणि काॅंग्रेसमधील सत्तासंघर्ष प्रचंड गाजत आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील वातावरण पेटलं आहे.
पाचपैकी सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. अशातच भाजपच्या हातातून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी आमदार असले तरी भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भाजपमधील आमदार आणि मंत्री सध्या विरोधी पक्षांमध्ये जात आहेत.
अशात पंजाब या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या राज्यात सध्या काॅंग्रेसची सत्ता आहे. पण सत्ता राखण्याचं मोठं आव्हान सध्या काॅंग्रेससमोर आहे. परिणामी काॅंग्रेस नेते राहुल गांधी विशेष रणनिती आखत आहेत.
सध्या पंजाबची धुरा चरणजीत सिंह चन्नी यांच्या खांद्यावर आहे. काही महिन्यांपूर्वीच चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. परिणामी आता चन्नीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहतात की इतर कोणाला काॅंग्रेसकडून संधी देण्यात येेत ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुल गांधींनी पंजाबमध्ये डिजीटल पद्धतीनं रॅलीला संबोधित केलं आहे. त्यानंतर आता त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे. चन्नीजी, सिद्धूजी, पंजाबचे लोक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे.
मी वचन देतो की लवकरच तुम्ही सर्वांच्या पसंतीचे नाव तुमच्यासमोर ठेवू. पंजाबचे इतर सर्व नेते आणि मी मिळून नवीन सरकार मजबूत करू, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर आता नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंह चन्नी यांच्यात कोणाच्या नावाची चर्चा होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी
टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता
मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”
“तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”