मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर चुकिच्या भाषेत कविता केल्याप्रकरणी राज्यात गोंधळ माजला आहे.
केतकीवर सध्या राज्यभरात विविध पोलीस स्थानकांमध्ये 13 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. याचे आता राजकीय पडसाद देखील उमटायला लागले आहेत.
राज्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलीस केतकीच्या ताब्यासाठी प्रयत्न करत असल्यानं आता या प्रकरणावर रयक क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यभरात पोलीस स्थानकात फिरावे लागत आहे. केतकीनं तशी पोस्ट करायला नको होती. इतकी वाईट पोस्ट कशाला करायची, असं खोत म्हणाले आहेत.
केतकीच्या पोस्टनं एक झालं पाटील मेला आहे की नाही हे कळालं नाहीतर गावाला माहिती नव्हतं, असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे. परिणामी वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आमच्यावर देखील असेच गुन्हे दाखल झाले होते त्यामुळ राज्यभरात पोलीस स्थानकामध्ये जावं लागत आहे, असं देखील खोत म्हणाले आहेत.
दरम्यान, खोत यांनी सभा घेत महाविकास आघाडीवर आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जहरी टीका केली आहे. सोलापूरचं पाणी आता बारामतीला नेण्याचा डाव आहे, असं देखील खोत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ