मुंबई | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. परिणामी विविध पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो असं राजकीय जाणकार सातत्यानं म्हणत असतात. देशातील सर्वाधिक 403 विधानसभेच्या जागा असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली मोठं राजकीय परिवर्तनं झालं होतं. भाजपनं तब्बल 300 पेक्षा अधिक जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. परिणामी यावेळी देखील भाजपला तशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
पहिल्या फेरीतील मतमोजणीत भाजपनं स्पष्ट बहूमताचा आकडा गाठला आहे. आतापर्यंतच्या कलानूसार भाजप तब्बल 250 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे.
भाजपच्या वाढत चाललेल्या आघाडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. योगी पुढं जाणार हे नक्की होतं, असं राऊत म्हणाले आहेत.
समाजवादी पक्षानं देखील चांगली कामगिरी केली आहे. आपण सर्वांनी 5 वाजेपर्यंत वाट पाहाण्याची गरज आहे कारण उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये उत्तर प्रदेशच्या सत्तेसाठी मोठी लढाई चालू आहे. भाजपला सत्ता राखण्यात यश आलं तर ही एतिहासिक कामगिरी ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही
“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल