मुंबई | देशात आता होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
संख्याबळाचा विचार करता शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्याकडं 170 आमदार तर भाजपकडं 110 आमदार आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी चार तर भाजप दोन जागांवर आपला दावा दाखल करणार आहे.
महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकपक्ष एक जागा लढवण्याची शक्यता होती. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना सहावी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे.
शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्यानं अपक्ष निवडणूक लढवणारे छत्रपती संभाजी राजे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच राऊतांनी ट्विट करत सर्वांना इशारा दिला आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार, हे दुष्ट चक्र कधी थांबेल?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी, आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे जितेंगे, असं म्हणत राऊतांनी एकप्रकारे विरोधकांना आव्हान दिलं आहे.
संजय राऊतांच्या या आव्हानानंतर मात्र आता संभाजी राजेंची कोंडी झाली आहे. संभाजी राजेंनी अपक्ष आमदारांना पत्र लिहून पाठिंब्याची मागणी केली आहे.
शिवसेना सत्तेत आल्यापासून राजकीय नुकसान करून घेत होती अशी टीका भाजपनं वारंवार केलीयं. पण आता दोन राज्यसभा जागा शिवसेनेला मिळत असल्यानं हा शिवसेनेचा फायदाच आहे.
पाहा ट्विट –
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल
संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ