मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद होताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सातत्यानं महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद वाढत असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलच्या आदेशानं वादात भर पडली आहे.
दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असा आदेश न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतरही निवडणुका राष्ट्रीय स्तरावरच्या एकत्र लढवण्यावर एकमत होत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास यंत्रणांनी त्रास दिला आहे. तरीही आम्ही लढत आहोत, असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
दरम्यान, राज्यात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी राऊतांनी वक्तव्य केल्याप्रमाणे महाविकास आघाडी एकत्र लढणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका’; रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं
‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल
“गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”
कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू