अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अ.टक केलं होतं. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना अर्णव गोस्वामींनी आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आरोप अर्णव यांच्या कुटुंबाने केला होता. यानुसार कलम 306 अंतर्गत अर्णव गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ता.ब्यात घेतलं होतं.

मात्र, सुप्रीम कोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जा.मीन मंजूर केला होता. यामुळे अर्णव गोस्वामी कारागृहातून बाहेर आले होते. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाची सुनावणी केली आहे.

गोस्वामी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफ.आय.आर.चं मुल्यांकन केलं असता गोस्वामींवर आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त करण्याचा कोणताही गु.न्हा दिसून येत नाही,  अशी टीपन्नी सर्वोच्च न्यायलयाने याप्रकरणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायलयाने यावेळी मुंबई उच्च न्यायालयावर देखील टीका केली आहे.

एफ.आय.आर.वर विचार करणे, आरोपांचं स्वरूप आणि गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप यावर मुंबई उच्च न्यायलयाने लक्ष दिलं नाही. अर्णव गोस्वामी यांचा जामीन नाकारून उच्च न्यायलयाने चूक केली आहे, असंही सर्वोच्च न्यायलयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते.

मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते. यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली.

नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. यामुळे नाईक कुटुंबियांवर मोठं दुःख ओढवलं होतं. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझ्यावर वि.षप्रयोग करणारी ती…’; लता मंगेशकर यांचा धक्कादायक आरोप!

अबब!!! सोन्याचे भाव तब्बल 8 हजार रुपयांनी कोसळले; पाहा आजचे सोन्याचे दर

राष्ट्रवादीकडून ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हाकलपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!

शरद पवार रुग्णालयात दाखल; राष्ट्रवादीच्या लोकप्रिय नेत्याची तब्येत चिंताजनक

शरद पवारांवर टिका करणाऱ्यांची लायकी काढत उद्धव ठाकरे म्हणाले…