इस्लामाबाद – जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश झाला असून लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश असेल. पाकिस्तानच्या संसदेत यावर जोरदार घमासान झालं असून मी पाकिस्तान लष्कराला भारतावर हल्ला देण्याचा आदेश दिला पाहिजे का?, असा सवाल पंतप्रधान इम्रान खान यांनी तेथील विरोधकांना विचारला आहे.
नेमकं काय घडलं पाकिस्तान संसदेत?-
पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या या निर्णयावर चर्चा झाली. पाकिस्तान मुस्लिम लीग(N)चे नेते शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानने तिखट प्रतिक्रिया दिली पाहिजे, अशी इच्छा संसदेत बोलताना व्यक्त केली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर सभागृहात उत्तर दिलं. विरोधी नेत्यांची नेमकी अपेक्षा काय आहे?, मी पाकिस्तान लष्कराला भारतावर हल्ला देण्याचा आदेश द्यावा का?, अशी विचारणा इम्रान खान यांनी यावेळी केली.
मोदी सरकारने काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासहित लष्कराचे अधिकारी भारताविरोधीत वक्तव्यं करत आहेत. पाकिस्तानच्या अनेक खासदारांनी देखील भारताला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. तसंच युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे.
इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली का?
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता. मात्र कलम ३७० रद्द केल्यामुळे हा दर्जा समाप्त झाला आहे. जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट होऊन तो खऱ्या अर्थानं भारतीय संघराज्याचा भाग झाला आहे. मात्र यामुळे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट झाला आहे.
“काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल”, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केलं होतं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता, असा दावा देखील त्यांनी केला. हे प्रकरण आपण संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाऊ, असा इशारा देखील त्यांनी भारताला दिला आहे.
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान लष्करानं घेतली बैठक-
पाकिस्तानी लष्कराच्या अधिकृत ट्विटरवरुनही कलम ३७० हटवल्याबद्दल ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर बैठक घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. लष्कर पाकिस्तान सरकारसोबत आहे. पाकिस्तानचं लष्कर भारताचा हा निर्णय़ स्वीकारण्यास नकार देतं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी
-राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर
-“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”
-“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”
-“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”