मुंबई | पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंबलीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी (kasim khan suri) यांनी फेटाळून लावला आहे.
विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संविधानाच्या आर्टिकल 5च्या विरोधात असून असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी मोठा दिवस होता. इम्रान खान सत्ता टिकवण्यात यशस्वी होतात की सत्तेतून पायउतार होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पाकिस्तानातील विरोधी पक्षाने तर अविश्वास प्रस्ताव हरल्यानंतर इम्रान खान यांना अटक होईल असं सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय घडामोडीकडे आज संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं.
सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधित करताना संसद बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती दिली. माझ्या विरोधात परदेशातून षडयंत्रं झालं आहे. त्यामुळे देशातील जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी, असं आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
Skin Care | उन्हाळ्यात दह्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!
इम्रान खान यांच्यानंतर पुढचा पंतप्रधान कसा निवडला जाईल?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या