औरंगाबाद महाराष्ट्र

“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

औरंगाबाद : रस्ते अपघाताता मृत्यू पावणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मोटार वाहन दुरुस्ती कायदा संसदेत मांडण्यात आला. नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

नितीन गडकरींच्या नियतीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही आम्ही विरोधक जरी असलो तरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री म्हणून आम्ही त्यांचा नेहमी सन्मान करतो, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी सभागृहात गडकरींचं कौतुक केलं आहे.

मद्यपान करुन वाहन चालणाऱ्या आणि शेकडो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर वचक कसा बसवणार, असा सवालही मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करताना जलील यांनी केला.

‘पुणे-मंबई एक्सप्रेस वे’च्या कामाचं सगळं श्रेय गडकरींनाच जातं. असं म्हणत अधिवेशनात जलील यांनी पहिल्यांदाच गडकरींच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

इम्तियाज जलील यांनी आपल्या पहिल्याच संसद अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले. 

शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आणि आता मद्यपान करुन वाहन चालकांच्या मुद्द्यावरुन जलील यांनी प्रश्न विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

-त्या २ जागा द्या, नाहीतर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व जागा पाडू; शिवसेनेचा इशारा

-“मोठं होण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांवर टीका सुरु”

“मोदीजी तुमचं आणि ट्रम्पचं काय बोलणं झालं हे तुम्ही देशाला सांगावं”

IMPIMP