औरंगाबाद | मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत काल एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. हे उपोषण आक्षेपांसाठी नसून अपेक्षांसाठी आहे, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या उपोषणावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.
गेली पाच वर्ष राज्यात तुमचीच सत्ता होती की…. तेव्हा काय तुम्ही गोट्या खेळत होता का?, अशी धारदार टीका जलील यांनी पंकजा यांच्यावर केली आहे. पाणी प्रश्न गंभीर आहे हे मान्य आहे पण सत्ता गेल्यानंतर ही नौटंकी सुचते कशी? असंही जलील म्हणाले आहेत.
आम्ही एवढेही मूर्ख नाहीये आणि जनताही मूर्ख नाही. विरोधी पक्षात असूनही मी हे प्रश्न विचारत आहे. सत्ता असताना काही केलं नाही. आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी? हा प्रश्न तुमचे समर्थकही विचारतील, असंही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे मला कुणावरही टीका करायची नाही. ज्यांना माझ्यावर टीका करायचीये त्यांनी करावी. सरकार अजून नवं आहे. त्यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस झाले आहेत. त्यांना आणखी वेळ द्यायला हवा, असं पंकजा म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-सरकार बरखास्त होईल अशी धमकी देणाऱ्या मुनगंटीवारांना थोरातांचं सडेतोड प्रत्युत्तर!
-राज ठाकरेंची कोलांटीउडी…. आता म्हणतात ‘माझा CAA ला पाठिंबा नाही’!
-“ज्यांची चौकशी करायचीये त्यांची लवकर करा… तुमचं सरकार कमी काळाचं आहे”
-नवाब मलिकांचं मुनगंटीवारांना खुलं आव्हान!
-तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!