….तर मी स्वत: औरंगाबादचं नाव संभाजीनगर करेन- इम्तियाज जलील

औरंगाबाद  |  औरंगाबादचं नाव कधीही संभाजीनगर होऊ शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून महाराष्ट्राला सरप्राईज देतील, असं मोठं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यामुळे औरंगाबाद नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे.

पुढच्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवा. संभाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांचं नाव द्यायचं असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन, असं ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2 महिन्यांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासंबंधी जी काही माहिती लागते ती माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते, असं खैरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”

-कन्हैया कुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला!

-…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!

-धक्कादायक…. मासिक पाळी नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

-1 एप्रिल ठरवणार ‘ठाकरे सरकारचं भविष्य’; प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी