बरळणाऱ्या वारिस पठाणांच्या मदतीला धावले इम्तियाज जलील; म्हणाले…

मुंबई |  गुलबर्ग्यातल्या CAA विरोधी मोर्चात आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना एमआयएम पक्ष मात्र त्यांच्या मदतीला धावतो आहे किंबहुना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असं चित्र आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वारिस पठाण यांची भेट घेतली आहे. तब्बल तासभर जलील आणि पठाण यांंच्यात चर्चा झाली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले, “वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. तसंच पक्षाची अधिकृत भूमिका लवकरच सांगू”.

मी वारिस पठाण यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या वक्तव्यावर आमच्यात चर्चा झाली. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं पठाण यांनी सांगितल्याचं जलील म्हणाले.

दुसरीकडे एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद

-“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”

-बाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का?? सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर

-ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय? शरद पवार म्हणतात…

-राधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत; राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याचा दावा