इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…

औरंगाबाद | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यात पंकजा मुंडे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.

राजकीय वर्तुळात अनेक मुद्दे गाजत असताना एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना दिलेल्या प्रस्तावाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडेंनी एक वेगळा पक्ष स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव जलील यांनी मांडला आहे. राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची अपडेट आहे.

पक्षाकडून वारंवार हेटाळणी सहन करण्यापेक्षा पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असं जलील म्हणाले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाज जलील यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा याबाबत मी त्यांच्यासमोर दोन वेळेस प्रस्ताव मांडला असल्याचं देखील जलील म्हणाले. तर गरज पडल्यास एमआयएम पक्ष तुमच्या पाठिशी असेल असं आश्वासनही जलील यांनी दिलं.

गरज पडली तर एमआयएम पंकजा मुंडेंना मदत करेल, असंही जलील म्हणाले. जलील यांच्या या प्रस्तावानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पकंजा मुंडे यांनी खरंच स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल, असं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाच तर आगामी महापालिका आणि विधान परिषद निवडुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! नवाब मलिकांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

राहुल गांधींची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”

Presidential Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल