औरंगाबाद | आज 1 मे आहे. 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असून हिंदूंना माझी विनंती आहे की, जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी. एकदा होऊनच जावू द्या काय व्हायचं ते असं भडकावू आवाहन राज ठाकरेंनी केलं.
राज ठाकरेंच्या भाषणावर औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली. जलील यांनी मुस्लीम समाजाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्याची विनंती केली.
युवापिढी नोकऱ्यांसाठी भटकत आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी राज त्यांना भलतीकडेच भरकटवत आहेत. तसेच समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
भोंग्यांच्या विरोधात जी मुलं लाऊडस्पीकर लावतील, त्यांच्यावर गुन्हे दाखलं होतील. मात्र त्याचवेळी राज हे एसी कॅबिनमध्ये बसतील, असा टोलाही जलील यांनी राज ठाकरेंना लगावला.
राज ठाकरे तरुणांची आणि समाजाची दिशाभूल करत आहेत. राज यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा की नाही हे तरुणांनी ठरवायचं, असं जलील म्हणालेत.
महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमवर निर्णय घेईल. राज यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे मुस्लिमांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, अशी संयमी भूमिका जलील यांनी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा, म्हणाले…
“शरद पवार नास्तिक आहेत म्हटलं तर त्यांना झोंबल आणि….”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला”
“कोणी गोंधळ करायला आलं असेल तर तिथंच हाणा”; राज ठाकरे भर सभेत भडकले
“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितलं तर यांची हातभर फाटली आणि सांगतात….”