औरंगाबाद महाराष्ट्र

इम्तियाज जलील यांची विजयी रॅली; संसदेत दुष्काळावर भाषण अन् रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

औरंगाबाद |  एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांची आज तब्बल 2 महिन्यांनी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र त्यांची हीच मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी निळ्या आणि हिरव्या रंगांची उधळण केली. पण त्याबरोबरच हजारो लिटर पाण्याची नासाडी देखील केली. या रॅलीत जवळपास 7 ते 8 टँकर पाण्याची नासाडी करण्यात आली.  यावरूनच त्यांच्यावर आता चहूबाजूने टीका करण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरातील आझाद चौकापासून ते भडकल गेटपर्यंत ही विजयी रॅली काढण्यात आली होती. दुपारी 4 वाजता निघालेली ही रॅली रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती.

काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलिल यांनी संसदेत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या विषयावर जोरदार भाषण केलं. त्यांचं हे भाषण चांगलंच चर्चेत राहिलं. मग मराठावाड्यावर दुष्काळाची छाया असताना पाण्याची नासाडी कशासाठी? असा प्रश्न औरंगाबादकर विचारत आहेत.

ज्या औरंगाबाद शहरात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे त्याच शहरात खासदारांकडून पाण्याची नासाडी होत असल्याने फक्त संसदेतच भाषणं झोडायची का? भाषणातले मुद्दे प्रत्यक्षात कधी आणायचे? असे प्रश्न सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. झाल्या प्रकारावर आता जलील काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

नारायण राणेंचं आमंत्रण शरद पवारांनी स्विकारलं!

-‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

-बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते; संजय राऊतांनी मारला शालजोडीतून टोला

-राज ठाकरेंचं ‘मिशन विधानसभा’; या मुद्द्यावर घेणार ममता बॅनर्जींची भेट!

IMPIMP