Uncategorized

2014 साली एकच वाघ होता; आता 2019 साली दोन वाघ येणार!

पुणे : 2014 साली ‘कौन आया रे कौन आया…शेर आया शेर आया..’ अशी घोषणा देण्यात येत होती, मात्र आता 2019 ला घोषणा असेल ‘कौन आये कौन आये… दो शेर आये दो शेर आये, अशी घोषणा देण्यात येईल, असं एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील म्हणाले. औरंगाबादमध्ये एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाची संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना इम्तियाज जलील यांनी ही घोषणा दिली. 

गोर-गरिबांचे प्रश्न खासदार असदुद्दीन ओवैसी लोकसभेत मांडतात, पण 2019 ला प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असतील, असंही ते यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकतील. हे दोन्ही वाघ लोकसभेत जातील आणि गोरगरिबांचे प्रश्‍न मांडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाच्या या मेळाव्याला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

IMPIMP