5 हजार वर्षात कोणत्याही हिंदू राजाने मशीद पाडली नाही- नितीन गडकरी

नवी दिल्ली | पाच हजार वर्षांच्या इतिहासात कोणत्याही हिंदू राजाने एकही मशीद उद्धवस्त केली नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसंच कोणत्याही हिंदू राजाने तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केलं नाही, असंही ते म्हणाले आहेत.

राजधानी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्मसमावेशक हिंदुत्व आणि हिंदू संस्कृती यावर प्रकर्षाने आपली मतं मांडली.

आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत, असं ते म्हणाले.

आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून राज्य सरकार 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करणार!

-ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणणाऱ्या भुजबळांना फडणवीसांचं उत्तर

-छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर ठाकरे सरकारची मोठी कारवाई

-फडणवीसांच्या काळात सिडकोत घोटाळा झाल्याचा आरोप, कॅगचा ठपका?

-घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!; मातोश्री’च्या अंगणात लागले मनसेचे पोस्टर