लाईव्ह मॅचमध्ये अचानक दोन वर्षाचा चिमुकला शिरला मैदानात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्सचे व्हिडीओ असतात, तर गाण्याचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ प्रेरणादायी असतात. तर काही असे असतात की, त्यांना बघितल्यानंतर अंगावर काटाच उभा राहतो.

जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खेळांच्या लाईव्ह मॅच होत असतात. नुकताच दोन दिवसांपूर्वी टोकियोमध्ये यावर्षीचा ऑल्मपिक सोहळा पार पडला. त्यामध्ये भारत देशाने अनेक खेळांमध्ये बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे आपण हे पाहिलं असेल की, एखाद्या खेळाची लाईव्ह मॅच सुरू असताना अचानक एका प्रेक्षक नाहीतर एखाद्या खेळाडूनचा चाहता मध्येच त्या मैदान येताना.

परंतू काय तुम्ही एखाद लहान मुल लाईव्ह मॅच दरम्यान मैदान येताना कधी ऐकलं आहे का. नसेल तर सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुल अचानक सुरू असलेल्या मॅचमध्ये पळायला सुरूवात करतं. त्याचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचं समजतं आहे. अमेरिकेतील ओहियोमधील एका फुटबॉल मॅचच्या दरम्यान ही घटना घडली आहे. त्यावेळी एफसी सिनसिनाटी आणि ओरलँडो सिटी यांच्यामध्ये फुटबॉल खेळाचा सामना सुरू होता.

खेळ सुरू असतानाच अचानक एक दोन वर्षाचं लहान बाळ त्या मैदान पळत सुटलं. हे लक्षात आल्यानंतर त्या बाळाची आई त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावू लागली. जसं त्या बाळाला समजलं की आपल्याला पकडण्यासाठी आपली आई आपला पाठलाग करत आहे. त्यानंतर ते बाळ आणखिणच जोरात धावू लागलं.

हे पाहून त्याठिकाणी मॅच पाहायला आले असलेल्या सर्व प्रेक्षकांना या घटनेचे आश्चर्य वाटले. त्याचप्रमाणे जमलेले अनेक प्रक्षक त्या माईलेकांची मजा बघत होते. काही वेळ पाठलाग केल्यानंतर अखेर त्या आईने आपल्या दोन वर्षाच्या मुलाला पकडलं. आणि त्या मैदानाच्या बाहेर घेऊन गेली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘Major league Soccer’ या यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओतील लहान मुलाने अनेकांचं मन जिकलं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ जवळजवळ 2लाख लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी व्हिडीओला कमेंट्सही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ