आंध्र प्रदेशात मोठी घडामोड! सर्व 24 मंत्र्यांनी एकत्र राजीनामे दिले

हैदराबाद | देशाच्या राजकारणात आपल्या आगळ्यावेगळ्या राजकारणासाठी आणि निर्णयासाठी प्रसिद्ध असणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत.

आंध्र प्रदेश सरकारमधील रेड्डी आणि इतर चार मंत्र्यांना वगळून सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिल्याची माहिती आता मिळत आहे. परिणामी आंध्र प्रदेशात मोठी राजकीय खेळी होत असल्याची चर्चा आहे.

रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामुहिक राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मंत्री राजीनामे देणार असल्याची शक्यता आहे.

मंत्रीमंडळ बैठकीनंतर आता नव्यानं रेड्डी सरकारची मंत्रिमंडळ पुर्नरचना होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे.

नवीन मंत्रिमंडळाची घोषणा 9 किंवा 11 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. एकूण 26 जिल्ह्यातील 26 आमदारांना मंत्री बनवण्यासाठी जगमोहन रेड्डींनी ही राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे राज्यपालांची भेट घेवून नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख निश्चित करण्याची शक्यता आहे. परिणामी आंध्र प्रदेशच्या राजकारणाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जगनमोहन रेड्डींनी नवीन 13 जिल्ह्यांची निर्मिती केली होती. त्यानंतर लगेच आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन करून रेड्डींनी 2024 च्या निवडणुकीची तयारी चालू केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशामध्ये नव्या राजकीय समीकरणांचं गणित जुळवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यापैकी हा एक असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं

 “गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक

 मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं