पुणे महाराष्ट्र

बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’

बारामती |  पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता असताना आता ग्रामीण भागात देखील कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. बारामती तालुक्यातल्या मुर्टी या गावात एका तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुर्टी गावचा तरूण मुंबईमध्ये वास्तव्यास असतो. परंतू मुंबईतला वाढता रूग्णसंख्येचा आलेख पाहता त्याने गावाकडचा रस्ता धरला होता. चार ते पाच दिवसांपूर्वी तो मुर्टीमध्ये आला होता. मात्र त्याला लक्षणे दिसल्यानंतर आणि टेस्ट केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झालाय हे स्पष्ट झालं.

बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता 11 वर पोहचली आहे. प्रशासनाकडून मुर्टी गावाच्या सीमा सिल करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे. मुर्टी गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

आतापर्यंत बारामती तालुक्यात 6 रुग्ण बरे झालेत, तिघांवर उपचार सुरू आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. 29 मार्चला बारामतीत पहिला रूग्ण आढळला होता. तर 6 एप्रिल रोजी दुसरा रूग्ण आढळला होता. 7 एप्रिलला एकूण 4 रुग्ण आढळल्याने बारामतीत एकच सन्नाटा पसरला होता तसंच नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी- उद्योगमंत्री

-खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळला

-“संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या, आदित्य म्हणतो पावसाने बेड भिजतील; असले राज्यकर्ते….?”

-मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

-‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला