…म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं गंगाजलाने शुद्धीकरण!

बेगुसराय |  भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी गंगाजलाने शुद्धीकरण केलं. बेगुसराय जिल्ह्यातल्या बलिया विभागात हा प्रकार घडला आहे.

भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी हा पुतळा अशुद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप करत भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं गंगाजलाने शुद्धीकरण केलं. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा आयोजित केली गेली होती. या सभेपूर्वी गिरीराज सिंह यांनी डॉ. आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला होता.

सभा संपल्यानंतर 24 तासांनी भाकपचे स्थानिक नेते सनोज सरोज आणि राजदचे विकास पासवान अन्य काही कार्यकर्ते पुतळ्याजवळ आले आणि त्यानंतर त्यांनी पुतळ्याचं गंगाजलाने शुद्धीकरण केलं.

गंगजलाने पुतळा पूर्ण धुवून झाल्यावर त्यांनी जय भीम.. जय ज्योती अशा घोषणा दिल्या. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जलशुद्धीकरणाची देशात सध्या एकच चर्चा होतीये.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराज थोडा संयम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- नितीन बानुगडे पाटील

-भाजपला मोठा धक्का बसणार? या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता

-महाराज तुम्ही खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे

-इंदुरीकर महाराज आपण कीर्तन सोडू नका, लोकांना स्त्रियांचा आदर करायला शिकवा- चाकणकर

-पुण्यात नवी पोस्टरबाजी… ‘हॅपी अ‌ॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’