‘हवा येऊ द्या’मध्ये शाहू महारांजांचा आणि सयाजीराजेंचा अपमान?

मुंबई | झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जातं.

या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचं प्रमोशन करण्यात येतं. मात्र नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत ‘विजेता’ चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोमुळे ही चला हवा होऊ द्या टीम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नेटीझन्स आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी संताप व्यक्त करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

आमदारांच्या चालकांचा पगारही आता सरकार देणार

-रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग, मुख्यमंत्र्यांचा शब्द

-नाम फाऊंडेशनला मिळणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्यांचा पैसा जातो कुठे? – तनुश्री दत्त

-म्हणून पालकांनी लिहिलं मुख्यमंत्र्याना पत्र

-कोरोनाच्या झटका; आयपीएल संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!