‘या’ ठिकाणी रोज 2 तास मिळते केवळ एक रुपयात पोटभर जेवण!

नवी दिल्ली | अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येकाच्या मुलभूत गरजा आहेत . पण भारतात असे कितीतरी लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. यामुळे अनेकांना काही न खाताच तसेच उपाशी पोटीच झोपावे लागते.

पण समाजात असे काही लोक आहेत जे कोणाला उपाशी झोपावं लागू नये म्हणून प्रयत्न करत असतात. तुम्हाला आता अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत ज्यांनी गरजूंची भूक भागवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

दिल्लीत असे एक व्यक्ती आहेत जे केवळ एका रुपयात जेवण देतात. नांगलोईच्या गल्लीतील श्याम रसोई येथे रोज सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त एक रुपयात थाळी मिळते. श्याम रसोईच्या बाहेर फक्त गरीबच नाही तर प्रत्येक वर्गातील लोक असतात.

एएनआयच्या अहवालानुसार 51 वर्षीय प्रवीण कुमार गोयल हे गेल्या दोन महिन्यांपासून श्याम रसोई चालवत आहे. प्रवीण कुमार गोयल म्हणाले की, ‘आम्ही 1000 ते 1100  लोकांना जेवायला घालतो. तीन ई-रिक्षाच्या मदतीने इंद्रलोक, साई मंदिर सारख्या जवळच्या भागांमध्ये पार्सल उपलब्ध करून देतो.’

पुढे ते म्हणाले की, ‘श्याम रसोईच्या माध्यमातून जवळपास 2000 दिल्लीकर जेवण करतात. आम्हाला विविध लोकांकडून दान मिळते. काल एक वयस्कर आजी आल्या होत्या, त्यांनी आम्हाला काही रेशन दिले. अनेकांनी आम्हाला धान्य दिले, याप्रकारे मागील दोन महिन्यांपासून ही सेवा चालू आहे.

काही लोक आम्हाला डिजिटल माध्यमातूनही मदत करतात. आमच्याकडे अजून सात दिवस जेवण देण्याची क्षमता आहे. मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी रेशन देऊन हे सेवा चालू ठेवावी. सध्या प्रवीण कुमार गोयल हे सहा मदतनीसांच्या मदतीने हे काम करत आहे.

या कामात त्यांना काही स्थानिक लोक आणि कॉलेजचे मुलंही मदतीसाठी येतात. याआधी त्यांच्या एका थाळीची किंमत दहा रुपये होती. पण सध्या चालू असलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी ही किंमत एक रुपया केली आहे. या कामासाठी त्यांना व्यापारी रणजित सिंह यांनी प्रवीण कुमार यांना एक दुकान दिले आहे.

रणजित सिंह म्हणाले, ‘आम्ही कोणाकडूनही रोख पैसे घेत नाही. हे दान डिजिटल माध्यमाद्वारे करता येते, पण आम्ही रोख पैसे घेत नाही. इथे काही लोक नियमितपणे रोज जेवायला येतात आणि त्यातच आम्ही आनंदी आहोत.’ खरंच दुसऱ्याची मदत करण्यासाठी काही मोठे करावे लागत नाही, हे प्रवीण कुमार गोयल यांनी दाखवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!