युक्रेनमधील रॉकेट हल्ल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

नवी दिल्ली | उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह प्रदेशातील हल्ल्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. हे युद्ध संपावं, यासाठी जगभरातून मागणी केली जात असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केले आहेत.

खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला़. क्षेपणास्त्र हल्ला करून येथील एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.

एक व्हिडीओ समोर आला आहे. यात रस्त्यावरुन जात असताना एका व्यक्तीच्या समोर रॉकेट हल्ला होता. सुदैवाने ती गाडी लांब असल्याने बचावते.

दरम्यान, युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine War) या दोन देशात गेल्या आठवडाभरापासून युद्ध सुरू आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशात दोन दिवसांपूर्वीच चर्चेची पहिली फेरी पार पडली मात्र ती निष्फळ ठरली होती.

आज या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. यातून तरी मार्ग निघणार का? युद्धावर तोडगा निघणार का? असे अनेक सवाल जगाच्या मनात आहेत. चर्चेनंतरच युद्धाबाबत स्पष्टता येईल. मात्र आज पुन्हा हे दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत.

सकाळीच युक्रेनने (Ukraine) चर्चेला नकार दिल्याची बातमी आली होती. बेलारूसमध्ये (Belarus) या दोन्ही देशात चर्चेची पाहिली फेरी पार पडली आहे. त्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सध्याकाळपर्यंत या दोन्ही देशात चर्चा सुरू असल्याची बातमी आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

पाहा व्हिडीओ

 

 

महत्वाच्या बातम्या- 

Audi खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का; कंपनीने केली ‘ही मोठी घोषणा 

‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांना मोठा फटका; आता ‘या’ गोष्टीही महागल्या 

‘कोरोना महामारी संपली नाही’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा 

मोदींचा गड असणाऱ्या वाराणसीत ममता थेट भाजप कार्यकर्त्यांना भिडल्या, झालं असं की