जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर!

मुंबई | दोन वर्षांपासून जगात कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाल्यामुळे कोरोनाचे संकट टळले असे वाटत होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूने डोकेवर काढले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विविध देशांमध्ये पुन्हा निर्बंध लावण्यात येत आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आला आहे.

ओमिक्रॉनसह अन्य व्हेरिएंट्सना पायबंद करू शकेल असा उपाय सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. याबाबतचं संशोधन नेचरमध्ये (Nature) प्रसिद्ध झालं आहे

रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीबॉडीजच्या क्रियांपासून ही नवी म्युटेशन्स कसा बचाव करतात यासंबंधीची उत्तरं शोधत असताना, या नव्या म्युटेशन्सच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी संशोधकांनी एक अकार्यक्षम आणि प्रतिकृती बनवू न शकणारा सुडो व्हायरस तयार केला आणि त्याच्या मदतीनं संशोधन केलं, असं अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनचे सहाय्यक प्राध्यापक डेव्हिड वेसलर यांनी सांगितलं आहे.

इक प्रोटीनमधल्या सर्वाधिक संरक्षित साइट्सना म्हणजेच विशिष्ट घटकांना लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडीजवर लक्ष केंद्रीत केल्यास, विषाणूच्या सातत्याने होणाऱ्या उत्क्रांतीपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधणं शक्य आहे, असं संशोधनातून समोर आलं आहे.

दरम्यान, जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे.

ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे.

मुंबईमध्ये गेल्या तीन (Mumbai corona cases) दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा