हैराण करणारी बातमी समोर; 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू पण….

ग्वाल्हेर | ग्वाल्हेर (Gwalior News) जिल्ह्यातून हैराण करणारी बाब समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 5 दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र मुलीचा आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यावेळी हा खुलासा झाला. मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती आजारी असल्यानं ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. येथे 2 दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभाग हैराण झाला आहे. मुलीच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे पुन्हा नवा प्रश्न उभा राहिला आहे. आता आरोग्य विभागाकडून अन्य कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट केल्या जात आहे.

कोरोना व्हायरसची (Coronavirus) तिसरी लाट भयावह रूप घेताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे.

साऱ्या देशभर कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले. लाखो जणांना प्राण गमावावे लागले. अनेकांचे आप्तेष्ट या साथीने हिरावून नेले. हा हाहाकार इतका भयंकर होता की, स्मशानात प्रेत जाळण्यासाठीही रांगा लावाव्या लागल्या. मात्र यावरही आपण निर्धाराने मात केली. सगळ्या संकटांना पुरून उरलो. या कामी सर्वात मोठी मदत झाली, ती लसीकरणाची.

आता केंद्राने काही नवीन नियम सांगितलेत. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याला 3 महिने लस किवा बूस्टरचा डोसही घेता येणार नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या – 

राज्यात कोरोनाचा कहर कायम; जाणून घ्या आजची आकडेवारी

 “मोदींच्या हुकूमशाहीकडील वाटचालीला केवळ काॅंग्रेसच रोखू शकतं”

 LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये

रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी