मुंबई | गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज्यात निर्बंधमुक्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या दिलासादायक वातावरण आहे.
निर्बंधमुक्ती झाल्यानंतर आता मुंबई लोकलविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेनं लसीकरणाशी संबंधित पर्याय तिकीट अॅपमधून हटवला आहे.
लसीकरणाशी संबंधित पर्याय तिकीट अॅपमधून हटवल्यामुळे आता लसीकरण न झालेल्या नागरिकांनाही रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.
मुंबईतल्या रेल्वेसाठी काऊंटरवर आणि अॅपवर सर्वांकरिता तिकिट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता लशीचे दोन्ही डोस घेतलेल्याच प्रमाणपत्रं तिकिट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही आहे.
2 एप्रिलपासून राज्य सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. राज्य सरकारनं निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचं प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकारनं निर्बंध उठवण्याच्या निर्देशांनुसार, रेल्वेनंही सर्व कोविडसंदर्भातले निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनाही नियांमांचं ओझं बाळगायला लागणार नाही.
कोविड काळात बंद करण्यात आलेले सर्व अधिकृत एन्ट्री-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्कलेटर उघडण्यात येणार आहेत. तसेच फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काऊंटर आणि बुकिंगसाठी ईव्हीएम मशिन देखील आता उघडल्या जाणार आहेत.
हामारीच्या काळात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागला. मात्र आता मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात”
अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती”
Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी