Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | कोरोनाची (Corona) लागण झालेल्यांसाठी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

ज्या लोकांना याआधी कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे, त्यांना ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाने सांगितलं आहे.

ओमायक्रॉनच्या संसर्गावर फायनल स्टडी अद्याप झालेली नाही. मात्र, प्राथमिक परिणामांवरून असे दिसून येतं की, ज्यांना आधीच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे अशा लोकांवर याचा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

ओमायक्रॉन व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Variant of Concern म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत समावेश केला आहे. तसेच, हा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, असेही जागतिक आरोग्य संघटने म्हटलं आहे

सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना (Corona) लसीच्या डोसचाही ओमायक्रॉन व्हेरिएंटवर काही विशेष परिणाम होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी असं म्हटलं आहे की, लस कोणत्याही व्हेरिएंटपासून नक्कीच काही प्रमाणात संरक्षण देईल.

दरम्यान, भारतातील कोरोना विषाणूच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती 37 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात आहेत. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे.

नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका

“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल” 

‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख 

“…तर राज्यात Lockdown करावं लागणार” 

 “काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”