‘कर्मचारी पवारांच्या घरी जाणार हे पोलिसांना माहित होतं, पण….’; धक्कादायक माहिती समोर

मुंबई | एसटी महामंडळाचं विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट शुक्रवारी आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट शरद पवार यांचं मुंबईतील सिल्वर ओक हे निवासस्थान गाठलं. या निवासस्थानाच्या आवारात घुसून आंदोलक कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक तसंच दगडफेक केली.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (advocate Gunratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच 104 जणांना चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलं आहे.

आदल्या दिवशीच गुणरत्न सदावर्ते याने चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजताच पोहोचणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाही, असं पोलीस एफआयआरमध्ये उघड झालं आहे.

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. या प्रकरणाची FIR कॉपीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहे. न्यूज 18 लोकमतने या संदर्भात माहिती दिली आहे.

पोलीस दिलेल्या माहितीनुसार 7 तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा, त्यांना गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जातंय” 

“पैसे गोळा करून पचवले आणि ढेकर दिलीत, आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल”

‘आमची माणसं गायब झाली’; आंदोलक कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा 

मुंबई पोलिसांचा किरीट सोमय्यांना मोठा झटका! 

‘मी भारतातील लोकांना…’; इम्रान खान यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतुक