मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अचानक घेतलेली एक्झिट ही सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट होती. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली होती. अनेक बड्या कलाकारांनी सिद्धार्थच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली होती. तसेच त्याच्याबरोबरचे काही किस्से देखील शेअर केले होते.
अशातच आता सिद्धार्थ बरोबर बिग बॉसच्या घरात राहिलेला अभिनेता विशाल आदित्य सिंग याने सिद्धार्थच्या आठवणी शेअर करताना काही खुलासे केले आहेत. विशालने नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थ बरोबर झालेला शेवटचा कॉल आणि शेवटची भेट याविषयी माहिती दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना विशाल म्हणाला की, सिद्धार्थचा आणि माझा स्वभाव एकसारखा होता. आम्ही दोघेही स्वत:च्या जगात आनंदी असायचो. बिग बॉसमध्ये आमच्या दोघांमध्ये झालेल्या वादामुळे आम्ही एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं आणि पुन्हा एकमेकांना संपर्क करण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला नाही.
सिद्धार्थची आई आणि त्याची बहिण ‘खतरों के खिलाडी’ हा कार्यक्रम पाहत होत्या. या कार्यक्रमातील मी केलेले स्टंट्स त्यांना खूप आवडले. यानंतर सिद्धार्थने कुठून तरी माझा नंंबर मिळवला आणि मला कॉल केला. त्या रात्री आम्ही जवळपास अर्धातास कॉलवर बोलत होतो, असा खुलासा विशालने केला आहे.
पुढे बालताना विशाल म्हणाला की, आमचा कॉल झाल्यानंतर सिद्धार्थने भेटण्यासाठी मला मेसेज केले. यानंतर आम्ही दोघे भेटलो. त्यादिवशी आम्ही खूप गप्पा मारल्या.
परंतु सिद्धार्थच्या भेटीनंतर अवघ्या तीन दिवसांनंंतरंच त्याच्या मृत्यूची बातमी समजली. ही बातमी माझ्यासाठी खूप धक्कादायक होती, असं देखील विशालने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस 13’चा. विजेता राहिला आहे. या पर्वात विशाल आदित्य सिंग देखील सहभागी झाला होता. मात्र, शोदरम्यान विशाल आणि आदित्यमध्ये अनेकवेळा वाद पाहायला मिळाले. परंतु बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सिद्धार्थच्या पुढाकारामुळे या दोघांतील वाद मिटला होता.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण
दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं, अन् मग…; पाहा व्हिडीओ
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?
सिद्धार्थच्या मृत्यूमुळे कोलमडलेली शेहनाज ग्लुकोजवर? डिझायनरने केला खुलासा
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात? शाहिरचा मोठा खुलासा