मोठी बातमी समोर; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.

जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी दरम्यान कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून राणे पसार झाले होते. जिल्हा न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं.

नितेश राणेंना न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. मनिष दळवींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कणकवली येथील शिवसेना तसेच भाजप कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे.

या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता.

या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता.

महत्वाच्या बातम्या- 

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं