कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर

मुंबई | कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे, आणि आता कोरोनाचा एक नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट याला कारणीभूत ठरतो आहे, या कोरोना व्हेरिएंटचं नाव आहे ओमिक्रॉन. या व्हेरिएंटची दहशत इतकी आहे की, अनेक देशांनी आपल्या सीमा विदेशी नागरिकांसाठी बंद केल्या आहेत

आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशिवाय, जगभरातल्या इतरही देशात या व्हेरिएंटचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्रायल, हाँगकाँग, बेल्जियम यांचा समावेश आहे.

नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जगात बहुतांश देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेत जाणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. शिवाय, जे प्रवासी आधी दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत, त्यांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार झाला होता. तेव्हा रुग्णांची लक्षणं आणि रुग्णालयात भरती होण्याच्या संख्येवरून ओमायक्रॉन जास्त घातक नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, या निष्कर्षामध्ये प्रत्यक्ष पुराव्यांचा आधार नव्हता. त्यामुळे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधील संशोधकांनी पुन्हा अभ्यास केला.

संशोधकांनी ओमिक्रॉनची लागण झालेल्या 11 हजार 329 लोकांचा आणि कोरोनाच्या इतर व्हेरिएंटची लागण झालेल्या दोन लाख लोकांचा अभ्यास केला. या अभ्यासात अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत.

कोरोनामधू कोविड-19मधून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये काही महिन्यांपर्यंत स्पर्म क्वालिटी (Sperm quality) खराब झाल्याचं, संशोधकांना आढळलं. 35 पुरुषांवर याबाबत संशोधन करण्यात आलं. या पुरुषांच्या स्पर्मला संसर्ग झालेला नव्हता.

कोरोनातून बरं झाल्यावर एका महिन्यानंतर त्यांच्या स्पर्मची गतिशीलता 60 टक्क्यांनी कमी झाली आणि स्पर्मची संख्या 37 टक्क्यांनी कमी झाली. असं असलं तरी, कोरोनाचा संसर्ग आणि स्पर्मच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणताही संबंध आढळला नाही. हे संशोधन ‘फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी’मध्ये (Fertility and Sterility) प्रकाशित झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही- रोहित पाटील 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत” 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का? 

‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 

पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…