किव | रशियाच्या (Russia) ताब्यातून मुक्त झालेल्या कीवमध्ये 410 लोकांचे (bodies) मृतदेह सापडले आहेत. बुचा परिसरात सापडलेल्या मृतदेहांची माहिती महापौरांनी दिली आहे.
बुचा परिसरात (Bucha area) एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडल्यानंतर युक्रेनने रशियावर बुचामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला.
रशियन सैन्यानं नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं आहे. शक्य तितक्या युक्रेनियन लोकांना दूर करणं हे रशियन लोकांचं ध्येय आहे. आपण त्यांना थांबवून बाहेर काढलं पाहिजे. मी G-7 देशांना रशियावर अधिक कठोर निर्बंध घालण्यासाठी आवाहन करतो, असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलं आहे.
कीवच्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी मृतदेहांची माहिती दिली. ते म्हणाले की रशियन सैन्याने या शहरावर कब्जा केला आहे.महापौरांनी वृत्तसंस्था रॉयटर्सच्या टीमला मृतदेह दाखवले.
एका मृतदेहाचे हात पांढऱ्या कपड्याने बांधून तोंडात गोळ्या घातल्या होत्या. कोणत्याही युद्धात नागरिकांसाठी काही नियम असतात, मात्र रशियन सैनिकांनी जाणूनबुजून नागरिकांची हत्या केली आहे, असं फेडोरुक म्हणाले.
दरम्यान, स्कोमधील रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी बुचामध्ये सापडलेल्या मृतदेहांबद्दल विचारले असता लगेच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; आज ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं
‘…म्हणून मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो’; गडकरींनी स्पष्टच सांगितलं
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
“शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”