बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधीचा पहिला व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. खराब हवामानामुळे MI 17 V5 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या अपघातापूर्वीचा पहिला व्हिडीओ समोर आलाय.

हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा येणारा आवाज बंद झालेला व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? कधीचा आहे? कोणी शूट केला आहे? जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

या व्हिडीओची सत्यता अजून समोर आलेली नाही. केवळ सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या द्वारे हा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ एएनआयनं ट्विट केला आहे.

हेलिकॉप्टरचा आवाज ऐकत काही स्थानिक ढगाकडे बघतायत आणि ते हेलिकॉप्टर एकदम दाट ढगात गायब होताना दिसतंय. व्हिडीओत वातावरण खराब असल्याचंही स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा (CDS Bipin Rawat Helicopter crash) अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर चौकशी होईलच पण प्राथमिक माहिती जी हाती आलीय त्यानुसार रावत ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, त्याला अवघे 90 सेकंद आणखी मिळाले असते तर कदाचित ते वाचले असते.

फक्त तेच नाही तर त्यांची पत्नी मधूलिका रावत, तसच इतर 11 जणांचाही जीव वाचला असता. ताबद्दलही तेच झालेलं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं? 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय!