Pune | पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर

पुणे | पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर आलीये. तो म्हणजे पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रूपये 20 पैशांची वाढ (CNG) करण्यात आली आहे.

सीएनजी गॅस प्रति किलो दोन रूपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, आधीच महागाई वाढत आहे.

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाच्या दरात देखील भरमसाठ वाढ झाली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे सीएनजी देखील महाग झाला आहे.

दरम्यान, एकीकडे सीएनजीच्या दरात आज किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणेज आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ 

मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका 

राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की… 

‘ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो’; राज ठाकरे आव्हाडांवर बरसले

राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…