नवी दिल्ली | परदेशात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीएंटचा धोका वाढत असल्याचं दिसतंय. देशासह राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आता आणखी धक्कादायक अभ्यास समोर आला आहे.
भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे कोरोना लसीकरण झालेले आहेत. केंद्र सरकारनेच ही धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे सर्वांच्या चितेंत भर पडली आहे.
देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 358 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतातील बहुतेक ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये लक्षणं नाही दिसत आहेत. ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये याचं निदान झालं आहे.
केंद्र सरकारने भारतातील 183 ओमिक्रॉन रुग्णांचं विश्लेषण केलं. त्यानुसार 70% रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत तर आहेत. 91 टक्के प्रकरणं पूर्ण लसीकरण झालेले आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली.
जगातील लसी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे. एका प्राथमिक संशोधनाच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे. भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील Omicron च्या संसर्गाचा धोका आहे.
दरम्यान, भारतात शुक्रवारी कोरोना व्हायरलच्या ओमिक्रॉन वेरीएंटचे 122 रुग्ण नव्यानं आढळून आले आहे. आतापर्यंत आढलेल्या ओमिक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद ही शुक्रवारीच करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या रुग्णांची आकडेवारी त्यामुळे 358 झाली असून महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे अनेक राज्य सतर्क झाली आहे. मध्य प्रदेशात सगळ्यात आधी नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनंही काही निर्बंध आणि नवी नियमावली जारी केली आहे.
आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
तसेच लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
महत्वाच्या बातम्या –
“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”