पुणे | राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात रूग्णांची संख्या पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.
नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.
पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणाले.
पुण्यातील कोरोनास्थिती आणि आरोग्य व्यवस्थेबाबत माहितीही महापौरांनी या बैठकीनंतर दिली. मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेत आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमिक्रॉनचे 27 रुग्ण आहेत. यात दोन्ही डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असं महापौरांनी सांगितलं.
पुण्यात मुबलक औषधांचा साठा आहे. 4 हजार रेमडिसिव्हर आहेत. तसंच 1 हजार 800 बेड आता महापालिकेकडे आहेत. 12 ऑक्सिजन प्लांट आहेत. सूचना मिळाली तर 7 दिवसांच्या आत जम्बो रुग्णालय चालू करु शकतो. जम्बो रुग्णालयाची पूर्ण तयारी झाल्याचंही महापौर म्हणाले.
आधीच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होईल. कारवाई करण्यासाठी भरारी पथकं तयार केली जाणार असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
लसीकरणाबाबत पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस सुरु करत आहोत. तसंच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्य आरोग्य विभागाने कोरोनाच्या परिस्थितीची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात नवे 50 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता
बापरे! कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर
मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!